Saam Tv
ड्रायफ्रुट्समध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि कॅलरीज असतात. त्यामुळे जेव्हा भूक लागेल तेव्हा चीप्स खाण्याऐवजी ड्रायफ्रुट्स खाल्ले तर दिवसभर ऊर्जा टिकून राहिल.
नट्समध्ये असलेले अनसॅच्यूरेटेड फॅट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. अमिनो अॅसिडमुळे रक्तवाहिन्या लवचिक राहतात त्यामुळे हृदयविकार दूर राहतात.
मनुका, अंजीर, खजूर यांसारख्या ड्राय फळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पचनसंस्था सुरळीत राहते.
ड्रायफ्रुट्स खाल्याने प्रोटीन, फायबर आणि फॅट्समुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे आपसूकच इतरवेळी खाणे भूक लागणे कमी होते.
अक्रोडसारख्या नट्समध्ये ओमेगा - ३ फॅटी अॅसिड्स असते. ज्याला ब्रेन फूड म्हटले जाते. या नट्समध्ये असणाऱ्या हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन्समुळे मेंदू तल्लख राहतो. एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते.
बदाम आणि अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई असते त्यामुळे त्वचेवर ग्लो येतो. सुरकुत्या कमी होतात. तसेच अंजीरामुळे पिंपल्स कमी होतात.
मनुका, खजूर आणि बेरीजमध्ये यांसारख्या ड्रायफ्रुट्समध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे स्ट्रेस कमी होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.