Surabhi Jayashree Jagdish
पांढरे कपडे लवकर खराब होतात. खासकरून काखेच्या जवळ किंवा गळ्याकडे घामाचे पिवळे डाग जाता जात नाहीत.
घामामुळे पांढऱ्या कपड्यांवर पडलेले पिवळे डाग काढणे थोडे कठीण असले तरी, काही घरगुती उपायांनी ते सहज काढता येतात.
डाग असलेल्या भागावर लिंबाचा रस लावा आणि कपडा उन्हात वाळत ठेवा. लिंबातील आम्ल आणि सूर्यप्रकाश नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करतात, ज्यामुळे डाग फिके पडतात.
एक कप पाण्यात ४ चमचे बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट डागांवर लावा आणि १-२ तास राहू द्या. नंतर नेहमीप्रमाणे कपडे धुवा.
एक कप पांढरा व्हिनेगर आणि दोन कप पाणी मिसळा. या मिश्रणात डाग असलेला कपडा ३० मिनिटे भिजत ठेवा. नंतर नेहमीप्रमाणे धुवा.
डाग असलेल्या भागावर थोडे मीठ लावा. त्यावर थोडा लिक्विड डिटर्जंट टाका आणि हळूवारपणे चोळा. काही मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर धुवा.
घामाचे डाग गरम पाण्याने धुतल्यास ते अधिक पक्के होऊ शकतात. त्यामुळे थंड किंवा कोमट पाणी वापरा.