Nail health: पिवळी नखं, काळी रेष...नखांवर दिसणारे हे 7 बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Surabhi Jayashree Jagdish

नखांवर पांढरे ठिपके

नखांवर दिसणारे पांढरे ठिपके बहुतेकदा नखाला झालेल्या किरकोळ इजेमुळे निर्माण होतात. मॅनिक्युअर करताना नखांना झालेली इजा किंवा त्यावर पडलेला दबाव यामुळेही असे ठिपके दिसू शकतात.

White spots on nails | saam tv

पिवळी नखं

नखांचा रंग पिवळसर होण्यामागे फंगल इन्फेक्शन हे एक कारण असू शकतं. वारंवार किंवा दीर्घकाळ नेल पॉलिश वापरल्यानेही नखांचा नैसर्गिक रंग बदलू शकतो.

Black line on nail | saam tv

नखावर दिसणारी काळी रेष

नखावर नव्याने काळी रेष दिसल्यास तिच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. ही रेष वाढत असेल किंवा तिच्या रंग, आकार अथवा स्वरूपात बदल होत असेल तर त्वचारोगतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. कोणतीही स्पष्ट इजा झालेली नसताना अशी रेष दिसल्यास वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरतं.

Nail pitting | saam tv

कमकुवत नखं

नखं वारंवार तुटणं किंवा कमकुवत होणं हे कोरडेपणामुळे होऊ शकतं. सतत पाण्याच्या संपर्कात राहणं किंवा डिटर्जंटचा वारंवार वापर केल्यानेही नखांची स्थिती बिघडू शकते. अशा परिस्थितीत नखांमध्ये कोरडेपणा आणि कमकुवतपणा वाढू शकतो.

Black nails | saam tv

नखांवर छोटे खड्डे

नखांच्या पृष्ठभागावर छोटे-छोटे खड्डे दिसण्याला pitting असं म्हणतात. काही वेळा हा बदल psoriasis किंवा eczema सारख्या त्वचारोगांशी संबंधित असू शकतो. नखांवर अशा प्रकारचे खड्डे वारंवार किंवा अनेक नखांवर दिसत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Fungal nail infection | saam tv

फिकट नखं

नखांचा रंग नेहमीपेक्षा अधिक फिकट दिसत असल्यास त्याचा संबंध अॅनिमियाशी असू शकतो. शरीरातील लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असल्यास नखं फिकट दिसू शकतात. मात्र नखांचा रंग पाहून अॅनिमियाचं निश्चित निदान करता येत नाही.

Nail pigmentation | saam tv

काळसर नखं

नखांचा रंग काळसर होण्यामागे नखेला झालेली इजा हे एक कारण असू शकते. नखाखाली रक्त साचल्यामुळेही नख काळसर किंवा काळे दिसू शकते. काही वेळा pigmentation मुळे नखांचा रंग गडद होऊ शकतो.

Nail problems | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Yellow nail causes | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Dermatologist nail check | saam tv
येथे क्लिक करा