Chetan Bodke
सध्या सर्वत्र लग्नघाई सुरु आहे. सर्व सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आपल्या जोडीदारासोबत लग्नगाठ बांधत आहेत.
बॉलिवूडची फेमस डान्सर मुक्ती मोहनने बॉयफ्रेंड कुणाल ठाकूरसोबत सप्तपदी घेत लग्नबंधनात अडकली. आता तिच्यानंतर आणखी एका टेलिव्हिजन अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली.
'दिल दोस्ती डान्स' फेम वृषिका मेहता हिने बॉयफ्रेंड सौरभ घेडियासोबत लग्न केले आहे.
“भवद्भिः सह सङ्गतिः आजीवनं तिष्ठतु... सर्वेषु कार्येषु सफलतां जनयतु। तुझी साथ मला आयुष्यभर मिळालेली आहे. दोघांनाही प्रत्येक प्रयत्नांमध्ये यश मिळो.” असं कॅप्शन देत लग्नातला व्हिडीओ आणि फोटोज शेअर केले आहेत.
गेल्या वर्षी अर्थात ११ डिसेंबर २०२२ रोजी बॉयफ्रेंड सौरभ घेडियासोबत अहमदाबादमध्ये साखरपुडा केला होता. ठिक एका वर्षानंतर वृषिका आणि सौरभने लग्न केले.
वृषिका आणि सौरभच्या लग्नातील लूकबद्दल बोलायचे तर, वृषिकाने हेवी लाल रंगाचा लेहेंगा तर सौरभने राखाडी रंगाची शेरवानी परिधान केली होती.
वृषिकाचा नवरा सौरभ घेडिया हा टोरंटोमध्ये राहतो. तो व्यवसायाने सेलिब्रिटी वैगेरे कोणीही नसून सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
वृषिका- सौरभ या दोघांचीही ओळख एका कॉमन फ्रेंडच्या ओळखीने झाली. नंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
शांतनू माहेश्वरी, टीना दत्ता, नायरा बॅनर्जी, सुयश राय, किश्वर मर्चेंटसह अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून वृषिका- सौरभला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.