Priya More
२०२४ हे वर्ष अनेक गोड आणि कडू आठवणींनी भरलेले होते. या वर्षी अनेक स्टार्सचे लग्न झाले तर काही स्टार्सचे घटस्फोट झाले.
संगीतकार ए आर रहमानने २९ वर्षांच्या लग्नानंतर पत्नी सायरा बानोला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे.
रहमान आणि सायरा बानो यांचे १९९५ मध्ये लग्न झाले. त्यांना खतिजा, रहिमा आणि अमीन अशी ३ मुलं आहेत.
दाक्षिणात्य सुपरस्टार जयम रवी आणि आरती यांचाही यावर्षात घटस्फोट झाला. जयम रवी आणि आरती यांचे २००९ मध्ये लग्न झाले होते.
लग्नाच्या २५ वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि सप्टेंबर २०२४ मध्ये घटस्फोटाची घोषणा केली.
साऊथ सुपरस्टार धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा देखील घटस्फोट झाला. त्यांचे २००४ मध्ये लग्न झाले होते.
धनुष-ऐश्वर्याने २०२२ मध्येच वेगळे होण्याची घोषणा केली होती. २०२४ मध्ये दोघांनाही कोर्टाकडून घटस्फोटाची अधिकृत मान्यता मिळाली.
हार्दिक पांड्या- नताशा स्टॅनकोविचने यावर्षी जुलै २०२४ मध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती.दोघांना अगस्त्य नावाचा मुलगा आहे.
हार्दिक आणि नताशा यांनी ४ वर्षे एकत्र राहिल्यानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या निर्णयाने सर्वांना धक्का बसला.
ईशा देओल-भरत तख्तानी यांनी देखील यावर्षी घटस्फोट घेतला. दोघांना २ मुली आहेत.