Shraddha Thik
अनेकांना नेहमी आळस येतो, त्यामुळे लोक जांभई देतात. काही अभ्यासानुसार, असे बरेच लोक आहेत जे दिवसातून तब्बल 100 वेळा जांभई देतात.
अशा लोकांमुळे त्यांच्या आसपास बसणाऱ्या लोकांच्या कामातही अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते.
तुम्हालाही नेहमी आळस येत असेल तर या गोष्टींकडे दुर्लक्ष्य करू नका.
सतत जांभई येण्याचे मुख्य कारण म्हणजे अपुरी झोप. काही लोक रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी लवकर उठतात. यामुळे त्यांना शरीराला पुरेशी झोप मिळत नाही. रात्री झोप न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी तुम्हाला खूप थकवा जाणवतो आणि तुम्हाला जास्त जांभई येते.
जास्त जांभई येणे हे हायपोग्लाइसेमियाचे प्रारंभिक लक्षण मानले जाते. रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी झाल्यामुळे सुद्धा आपल्याला जांभई येते.
तुम्हाला जर सतत जांभई येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हे हृदय विकाराचे सुद्धा लक्षण असू शकत. जास्त जांभई येणे हे हृदयाच्या आसपास रक्तस्त्राव किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता देखील दर्शवते.
निद्रानाश हा झोपेशी संबंधित आजार आहे. यामध्ये माणसाला एकतर रात्री लवकर झोप लागत नाही, आणि जर लागली आणि काही कारणास्तव तो जागा झाला तर पुन्हा झोपणे त्याच्यासाठी कठीण होऊन बसते. रात्री झोप न मिळाल्याने लोकांना दिवसा जास्त झोप येऊ लागते त्यामुळे त्यांना खूप जांभई येते.