Shruti Vilas Kadam
यामीने फिकट गुलाबी (baby pink) आणि गडद लाल (deep red) अशा दोन विरोधी रंगांचा सुंदर कॉन्ट्रास्ट साधला. या दोन रंगांच्या मेलमुळे लुक अधिक उठावदार दिसतो.
तिने परिधान केलेला सूट हा पारंपारिक भारतीय डिझाइन आणि आधुनिक फॅब्रिकने तयार करण्यात आला आहे. त्यामुळे लुकला खास ओळख मिळाली.
यामीने आपल्या लुकमध्ये जास्त मेकअप किंवा अॅक्सेसरीज वापरले नाहीत. तिने सॉफ्ट लिप शेड, नॅचरल मेकअप आणि हलका ब्लश लावला आहे.
सोप्या आणि नैसर्गिक हेअरस्टाईलमुळे तिचा संपूर्ण लुक अधिक ग्रेसफुल आणि एलिगंट दिसत होता.
गुलाबी रंगाने स्त्रीत्वाचा सौम्यपणा दाखवला तर लाल रंगाने आत्मविश्वास दिसतो. या दोन रंगांमुळे तिचे सौंदर्य अधिक उठून दिसते.
या लुकमुळे फॅशन जगतात पुन्हा एकदा कॉन्ट्रास्ट रंगांचा ट्रेंड सुरु झाला आहे. अनेक फॅशन ब्लॉगर आणि डिझायनर या लुकची चर्चा करत आहेत.
यामीचा हा लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांनी तिच्या स्टाईल सेन्सचं भरभरून कौतुक केलं आहे.