Shruti Vilas Kadam
लिंबू-पाण्यातील व्हिटॅमिन C त्वचेला निखळ उजळपणा देते. दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि त्वचा आरशासारखी चमकते.
कोरफडीचा रस पचन सुधारतो आणि आतड्यांतील सूज कमी करतो. यात अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने त्वचेवरील डाग, मुरुम आणि कोरडेपणा कमी होतो.
ग्रीन टीमधील पॉलीफिनॉल्स आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेची इन्फ्लेमेशन कमी करून त्वचेला तजेलदार बनवतात. नियमित सेवन केल्याने हार्मोनल एक्ने कमी होण्यास मदत होते.
या ड्रिंक्समुळे लिव्हर आणि किडनी स्वच्छ राहतात. त्यामुळे रक्त शुद्ध होते आणि त्वचेला आरोग्यदायी तेज प्राप्त होते.
दररोज सकाळी या पैकी एखादे ड्रिंक घेतल्याने पचनसंस्था व्यवस्थित कार्य करते. यामुळे पोट साफ राहते आणि त्वचेवरचा निस्तेजपणा दूर होतो.
या ड्रिंक्समधील नैसर्गिक घटक त्वचेतील ओलावा टिकवतात आणि कोरडेपणा कमी करतात, ज्यामुळे चेहऱ्यावर मऊपणा येतो.
महागड्या स्किनकेअर उत्पादनांशिवायही या नैसर्गिक पेयांमुळे त्वचेला आतून पोषण मिळते. त्यामुळे चेहरा स्वच्छ, तजेलदार आणि आरोग्यदायी दिसतो.