Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला तुळशीची पूजा करा, घरात स्थायिक होईल सुख-समृद्धी

Dhanshri Shintre

अत्यंत पवित्र

ज्योतिषशास्त्रानुसार योगिनी एकादशीची तिथी अत्यंत पवित्र मानली जाते आणि या दिवशी विशेष उपाय केल्यास अनेक शुभ परिणाम मिळू शकतात.

तुळशीची पाने अर्पण करा

योगिनी एकादशीच्या दिवशी आर्थिक लाभासाठी भगवान विष्णूला तुळशीची पाने अर्पण करा आणि तुळशीसमोर तेलाचा दिवा लावायला विसरू नका.

तुळशीची पाने तोडू नये

एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे वर्ज्य मानले जाते, त्यामुळे ती पाने एक दिवस आधीच तोडून ठेवावीत, हे लक्षात ठेवावे.

मंत्राचा जप

योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि पुण्य लाभतो.

सात वेळा प्रदक्षिणा

तुळशीची सात वेळा प्रदक्षिणा घालून लाल रंगाचा पवित्र दोरा बांधा आणि नंतर लक्ष्मी-विष्णूला समृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना करा.

धान्यांचे दान

योगिनी एकादशीच्या पावन दिवशी गहू, तांदूळ, डाळ यांसारख्या धान्यांचे दान केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि शुभ फल प्राप्त होते.

गरजूंना अन्नदान

योगिनी एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्नदान करणाऱ्यांना आयुष्यात कधीही अन्नाची किंवा आर्थिक अडचणींची कमी जाणवत नाही, असे मानले जाते.

NEXT: आषाढी एकादशीला काय करावे आणि काय नाही?

येथे क्लिक करा