Sakshi Sunil Jadhav
मुंबईतील दादरपासून हाकेच्या अंतरावर वरळी किल्ला आहे.
१६७५ साली ब्रिटीशांनी बांधलेला हा एक प्रसिद्ध किल्ला आहे.
तुम्ही फक्त १०० रुपयात संपूर्ण प्रवास करू शकता.
वरळी किल्ला उंच भव्य आणि समद्रालगत आहे. पावसाळ्यात हे ठिकाण सगळ्यात बेस्ट आहे.
वरळी किल्याजवळ अजुनही मासेमारी मोठ्याप्रमाणात होते. तसेच तिथे अजुनही लोक बोट घेऊन मासे पकडायला जात असतात.
वरळी किल्यावर एक विहीर, मंदिर आणि माहीम वांद्रेचे दृश्य तुम्हाला पाहता येऊ शकते.
वांद्रे वरळी सी लिंक तुम्ही किल्यावरून सहज पाहू शकता.
वरळीचा किल्ला इतकी वर्षे जूना आहे. जो अद्यापही जुने वैभव टिकवून आहे.