Shreya Maskar
मुंबईला निसर्गाचे अद्भुत सौंदर्य लाभल आहे.
समुद्रकिनारे,चौपाटी,उद्यान तसेच किल्ले ही मुंबईत पाहायला मिळतात.
या पावसात गड किल्ल्यांना भेट देण्यासाठी मुंबईतील वरळीचा किल्ला हा उत्तम पर्याय आहे.
वरळीचा किल्ला वरळी बेटावरील एका टेकडीवर बांधण्यात आला आहे.
वरळीचा किल्ला हा पोर्तुगीजांनी बांधला आहे.
या किल्ल्यावरून वरळीच्या समुद्राचे निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळते.
वरळी कोळी वाड्यामध्ये हा किल्ला वसलेला आहे.
दादर स्टेशन वरून टॅक्सीच्या साहाय्याने तुम्ही येथे पोहचू शकता.
या किल्ल्याला तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी भेट देऊन निसर्ग सौंदर्य अनुभवा.
किल्ल्याच्या दक्षिणेला त्रिकोणी बुरुज तर किल्ल्याला भक्कम तटबंदी आहे.