ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लिपस्टिक हे एक असे प्रोडक्ट आहे. जे प्रत्येक महिलांचे स्टाइल स्टेटमेंट आहे.
आपल्याला माहितीये की, मेकअपचे प्रोडक्टस हे महाग असतात. परंतु जगातील अशी लिपस्टिक ज्याची किंमत ऐकून तुम्हाला नक्की धक्का बसेल.
या लिपस्टिकचे नाव कोर्चर ब्युटी डायमंड लिपस्टिक H. Couture Beauty Diamond Lipstick आहे. १८ कॅरेट सोन्याच्या लिपस्टिक केसमध्ये १२०० गुलाबी हिरे बसवले आहेत.
ज्या बॉक्समध्ये ही लिपस्टिक येते ती पूर्णपणे हिऱ्यांनी बनलेली असते. तसेच यामध्ये १२०० गुलाबी रंगाचे डायमंड बसवलेले असतात.
स्टाइल स्टेटमेंटसह ही एक प्रकारची गुंतवणूक आहे. श्रीमंत लोक ही लिपस्टिक जास्त प्रमाणात खरेदी करतात.
ही लिपस्टिक विशेषता श्रीमंत ग्राहकांसाठी बनवण्यात आली आहे. याची किंमत याला इतर लिपस्टिकपेक्षा वेगळी बनवते.
या लिपस्टिकची किंमत १४ मिलियन डॉलर म्हणजेच 1. 4 कोटी रुपये आहे.