ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
युनायटेड नेशन्स वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट म्हणजेच जागतिक आनंदी अहवालात सर्वात आनंदी असलेल्या देशाची रॅकिंग जाहिर करते.
जगातील सर्वात आनंदी देशांची यादी समोर आली आहे. तुम्हाला माहित आहे का यात कोणते देश आहेत. आणि यात भारत आणि पाकिस्तान कोणत्या स्थानावर आहे. चला तर जाणून घेऊया.
हा अहवाल तयार करताना यामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य, जीडीपी, सामाजिक समर्थन, आणि भ्रष्टाचाराची पातळी असे अनेक मापदंड वापरले जातात.
आनंदी देशाच्या टॅाप १० यादीत न्यूझीलंडचा समावेश आहे. सुरक्षित वातावरण आणि उच्च उत्पन्न अशा अनेक कारणांमुळे आनंदी देशाच्या यादीत लक्झेंबर्ग ९व्या स्थानावर आहे.
स्वित्झर्लंड हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. उत्कृष्ट आरोग्य सेवा आणि आर्थिक स्थिरता यामुळे स्वित्झर्लंड आठव्या स्थानावर आहे.
याशिवाय या यादीत नॅार्वे, नेदरलँड्स, इस्रायल, स्वीडन, आईसलॅंड,डेन्मार्क या देशांचा समावेश आहे.
फिनलँड सलग सातव्या वर्षी सर्वात जगातला सर्वात आनंदी देश ठरला आहे. उत्कृष्ट आरोग्य सेवा, मजबूत शिक्षण व्यवस्था आणि नैसर्गिक सुंदरतासाठी हा देश ओळखला जातो.
आनंदी देशाच्या यादीत पाकिस्तान १०८व्या स्थानावर आहे. पाकिस्तानाचा जागतिक आनंदाचा स्कोअर ४.६६ आहे.
भारताचा जागतिक आनंदाचा स्कोअर ४.०५ असून आनंदी देशाच्या यादीत भारत १४३ देशांमध्ये १२६व्या क्रमांकावर आहे.
NEXT: हिवाळ्यातही आरोग्य राहिल निरोगी, डाएटमध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश