Manasvi Choudhary
यंदा २६ फेब्रुवारीला महाशिवरात्री हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
महादेवाच्या दर्शनासाठी भाविक शंकराच्या मंदिरात जातात.
पण तुम्हाला माहितीये का जगातील सर्वात उंच मंदिर कोणते?
उत्तराखंडच्या रूद्रप्रयाग जिल्ह्यात तुंगनाथ नावाचे मंदिर आहे.
जगातील सर्वात उंच शिव मंदिर म्हणून ते ओळखले जाते.
समुद्रसपाटीपासून अंदाजे ३,६८० मीटर उंचीवर हे मंदिर आहे.
शिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात दर्शन घेतल्याने सर्व पाप नष्ट होतात असे मानले जाते.