ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बाहेरील अन्नपदार्थ आणि दूषित पाण्यामुळे हिपॅटायटीस A आणि E होण्याचा धोका वाढतो. घरचे ताजं व स्वच्छ अन्न आणि उकळलेलं पाणी प्या.
हिपॅटायटीस A आणि B साठी लस उपलब्ध आहे. बाल्यावस्थेतच लसीकरण आणि गरजेनुसार प्रौढांनीही लस घ्यावी.
हिपॅटायटीस B आणि C हे रक्ताद्वारे पसरतात. त्यामुळे सुई, रेझर, नेल कटर यासारख्या वस्तू इतरांसोबत शेअर करू नका.
हिपॅटायटीस B आणि C लैंगिक संबंधातूनही पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य प्रतिबंधक वापरणे आवश्यक आहे.
स्वच्छ हात धुणे, स्वयंपाक करताना स्वच्छता राखणे आणि शौचालय वापरून हात धुणे या गोष्टी आवश्यक आहेत.
अल्कोहोल यकृतावर दुष्परिणाम करतो. हिपॅटायटीस झाल्यास अल्कोहोलमुळे आजार बळावू शकतो, त्यामुळे त्याचे सेवन टाळा.
हिपॅटायटीसचे लक्षणे उशिरा दिसतात. त्यामुळे नियमित रक्ततपासणी व यकृताच्या कार्याची तपासणी करून वेळेत निदान करणे आवश्यक आहे.