Woolen Cloth : हिवाळ्यात सतत लोकरीचे कपडे घालून मळले? स्वेटर धुवताना फॉलो करा 'ही' खास ट्रिक

Shreya Maskar

लोकरीचे कपडे

लोकरीचे कपडे सर्व धुवताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. नेहमीच्या कपड्यांसोबत लोकरीचे कपडे धुवू नका. लोकरीचे कपडे कायम वेगळे धुवा.

woolen cloth washing | yandex

नाजूक कपडे

लोकरीच्या कपड्यांमध्ये जॅकेट, स्वेटर, मफलर, कानटोपी यांचा समावेश असतो. तसेच हे कपडे खूप महाग असतात. त्यामुळे असे कपडे रोजच्या कपड्यांसोबत धुतल्यास  नाजूक कपड्यांना इतर कपड्यांचा रंग लागू शकतो.

woolen cloth washing | yandex

मशीनचा वापर

लोकरीचे कपडे नाजूक असतात, त्यामुळे वॉशिंग मशीनमध्ये धुवणे टाळा. वॉशिंग मशीनमध्ये लोकरीचे कपडे धुतल्याने ते अधिक खराब होऊ शकतात किंवा लोकर विसवण्याची शक्यता असते.

woolen cloth washing | yandex

कोमट पाणी

हिवाळ्यात लोकरीचे कपडे धुवताना ते उलट करून कोमट पाण्यात टाका. जेणेकरून कपड्यांवरील डिझायन खराब होणार नाही आणि कपडे चांगले स्वच्छ होतील.

woolen cloth washing | yandex

स्टेन रिमूवर

लोकरीच्या कपड्यांना डाग लागल्यास स्टेन रिमूवरचा वापर करा. कोमट पाण्यात स्टेन रिमूवर मिसळून कपडे २-३ तास ठेवून द्या. त्यानंतर हलक्या हाताने कपडे धुवा.

woolen cloth washing | yandex

उन्हात वाळवा

लोकरीचे कपडे धुतल्यावर चांगले उन्हात वाळवा. त्यानंतरच स्वच्छ कपाटात ठेवून द्या. जेणेकरून त्यांना दमट वास येणार नाही आणि ते दीर्घकाळ चांगले राहतील.

woolen cloth washing | yandex

कपडे कधी धुवावे?

शक्य असल्यास जास्त वेळा लोकरीचे कपडे धुवू नका. ते लवकर खराब होतात. तसेच त्यांचा रंग देखील लवकरच फिका पडतो. त्यामुळे लोकरीचे कपडे कमीत कमी वेळा धुवा.

woolen cloth washing | yandex

महत्त्वाची गोष्ट

चुकूनही लोकरीच्या कपड्यांना ब्रश लावू नये. नाहीतर लोकरीचे धागे विसवले जातात.

woolen cloth washing | yandex

NEXT : नासलेले दूध फेकून देताय? थांबा! हिवाळ्यात बनवा 'असा' फेस सीरम, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

Face Serum | saam tv
येथे क्लिक करा...