Shreya Maskar
नासलेल्या दुधाचे सीरम बनवण्यासाठी कच्चे दूध, लिंबू, हळद, ग्लिसरीन, मीठ इत्यादी साहित्य लागते. याचे योग्य प्रमाण घ्यावे.
दुधात अर्धा चमचा लिंबू मिसळून काही वेळ तसेच ठेवून द्या. त्यानंतर नासलेल्या दुधाचे पाणी एका बाऊलमध्ये गाळून घ्या. याचा आपण सीरम बनवू.
नासलेल्या दुधाच्या पाण्यात एक चमचा ग्लिसरीन, एक चिमूटभर मीठ घालून छान मिक्स करा. हे मिश्रण काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या.
हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी पडते. त्यामुळे चेहऱ्याला हायड्रेट, मॉईश्चरायझ ठेवण्यासाठी नासलेल्या दुधाचे सीरम फायदेशीर आहे. 2 ते 3 दिवस याचा वापर करू शकता.
रात्री चेहरा कोरडा करून हलक्या हाताने चेहऱ्यावर दुधाचे सीरम लावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्याने धुवा. त्यानंतर तुम्ही चेहऱ्याला थंड गुलाबपाणी लावा.
नासलेल्या दुधातील पाण्यात लॅक्टिक ॲसिड भरपूर असते. जे चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी करून त्वचा मुलायम आणि हायड्रेट करते.
दुधामुळे त्वचेच्या पेशी निरोगी होतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. तसेच काळवंडलेला चेहरा स्वच्छ होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.