Shreya Maskar
हिवाळ्यात हाता-पायाला जखम झाली असेल तर दुर्लक्ष करू नका. उलट विशेष काळजी घ्या. कारण हिवाळ्यात त्वचा पटकन फाटते आणि कोरडी पडते.
सर्वप्रथम जखम थंड पाण्याने धुव. त्यावर अँटीसेप्टिक लिक्विड लावा. जेणेकरून जखम पूर्ण स्वच्छ होईल. त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्या.
दुखापत झालेल्या जागी १५-२० मिनिटांसाठी बर्फ लावा. कपड्यात गुंडाळून बर्फ त्वचेला लावा. थेट बर्फाचा स्पर्श शरीराला करू नका. जळजळ होऊ शकते.
पाय सूजला आली असेल तर हलक्या हाताने पट्टीने पाय बांधा. पाय घट्ट बांधू नका आणि हालचाल कमी करा.
कोमट पाण्याने सूजलेल्या भागाला शेक द्या. यामुळे स्नायूंच्या सिग्नलचे नियमन होण्यास आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.
जखम जास्त लाल झाली असेल किंवा जळजळ होत असेल. वेदना जास्त होत असतील तर त्वरित डॉक्टरकडे जा आणि योग्य तो उपचार घ्या.
जखमेवर हळदीचा लेप लावा. जेणेकरून तुम्हाला आराम मिळेल. यात तुम्ही गुलाब पाणी टाका, म्हणजे त्वचा काळी पडणार नाही आणि मऊ राहील.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.