Shreya Maskar
थंडीत शरीराला ऊब मिळावी, शरीर गरम रहावे म्हणून लोक रात्री झोपताना हाता-पायात मोजे घालतात. मोजे घातल्यामुळे थंडी जास्त लागत नाही. मात्र याचे काही दुष्परिणाम देखील आहे.
थंडीत रात्री मोजे घालून झोपल्यामुळे रक्ताभिसरणात समस्या निर्माण होऊ शकतात. ज्याचा शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतो.
मोजे घालून झोपल्याने ओव्हर हीटिंगची समस्या उद्भवू शकते. कारण मोजे शरीराला ऊब देतात.
मोजे घालून झोपल्यावर काही वेळाने अचानक शरीराचे तापमान वेगाने वाढते आणि आपल्याला अस्वस्थ वाटू लागते.
रात्रभर मोजे पायात आणि हातात घातल्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. जास्त काळ मोजे घातल्यामुळे पायांच्या नसांवरही खूप दबाव येतो.
थंडीत मोजे घालण्यापेक्षा पायाला आणि हाताला गरम तेलाने मालिश करा. थंडी वाजणार नाही. तसेच शांत झोप लागेल.
थंडीत झोपण्याआधी १०-१५ मिनिटे शतपावली करा. जेणेकरून शरीरात ऊर्जा निर्माण होईल. शरीर थंड राहणार नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.