ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पार्टी मेकअप करण्यापूर्वी, तुम्हाला तुमच्या आउटफिट आणि प्रोडक्सच्या शेड्सबद्दल काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. चुकीचा शेड तुमचा संपूर्ण लूक खराब करू शकते.
डोळ्यांचा मेकअप हा संपूर्ण मेकअमधील एक महत्तवाचा भाग आहे. डोळ्यांचा लूक नेहमीच रॉयल लूक देतो.
मेकअपमध्ये आयशॅडो महत्त्वाची भूमिका बजावते. आयशॅडो शेड्स तुमच्या डोळ्यांच्या मेकअपला उठून दिसण्यास मदत करतात.
जर तुम्ही पार्टीसाठी मेकअप करत असाल तर काही आयशॅडो शेड्स वापरून पहा. हे शेड्स नेहमीच ट्रेंडी असतात.
आयशॅडोसाठी, गुलाबी रंगाचा न्यूड शेड वापरून पहा जो जास्त चमकदार नसेल. त्यावर तुमच्या डोळ्यांना आयलाइनर आणि काजल लावा.
आयशॅडोचा गोल्डन शेड प्रत्येक आउटफिटवर आणि मेकअपवर चांगलाच सुट होतो.
आयशॅडोचा शिमरी शेड देखील ट्रेंडमध्ये आहे. पार्टी आउटफिटवर शिमरी शेड आयशॅडो लावा.
तुम्हाला स्मोकी आय लुक हवा असेल तर ब्लॅक शेडचा वापर करु शकता. हा ब्लॅक शेड तुमच्या डोळ्यांना बोल्ड लूक देईल.
आउटफिटवर मॅचिंग आयशॅडो देखील चांगला लूक देतात. पिंक शेड वाला आयशॅडो पिंक आउटफिटवर उठून दिसेल.