Shraddha Thik
आजकाल अनेक महिलांना पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजेच PCOS या समस्येचा सामना करावा लागत आहे. जर तुम्हाला या आजारापासून बचाव करायचा असेल तर तुम्ही काही प्रभावी योगासनांची मदत घेऊ शकता.
PCOS ही एक समस्या आहे जी शरीरातील प्रजनन संप्रेरकांच्या असंतुलनापासून सुरू होते. PCOS प्रस्त महिलांना सिस्टची समस्या असू शकते, म्हणजे अंडाशयात लहान ढेकूळ.
योग शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याच्या मदतीने शरीराला अनेक गंभीर समस्यांपासून वाचवता येते. अशा परिस्थितीत पीसीओएसपासून बचाव करण्यासाठी मदत करणाऱ्या योगासनांविषयी जाणून घेऊया...
भुजंगासनाला कोब्रा पोझ असेही म्हणतात त्यामुळे पोट आणि श्रोणीच्या भागावर दबाव येतो. अशा स्थितीत अंडाशय उत्तेजित होतात. या आसनामुळे पचनक्रिया सुधारते आणि तणाव कमी होण्यास मदत होते.
दररोज भारद्वाजासन केल्याने, पाठ, मान, खांद्याचा कडकपणा आणि वेदना यापासून आराम मिळू शकतो. या आसनाच्या मदतीने गर्भाशयाचे स्रायू मजबूत होतात.
PCOS टाळण्यासाठी तुम्ही बालासन करू शकता. या आसनाच्या मदतीने मध्यवर्ती मज्जासंस्था शांत होऊ शकते. यामुळे संपूर्ण शरीरात रक्त प्रवाह सुधारतो आणि पाठीच्या खालचा ताण, पीरियड कॅम्प्स आणि पीएमएसची लक्षणे टाळता येतात.
बद्धकोनासनाच्या मदतीने पेल्विक क्षेत्रातील रक्त परिसंचरण सुधारले जाऊ शकते. यामुळे तणाव कमी होतो आणि पुनरुत्पादक अवयवांची पुनर्प्राप्ती होण्यास मदत होते.