ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महिलांना दर महिण्याला मासिक पाळी येते. या काळात महिलांना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. मासिक पाळी महिलांमध्ये पाच ते सात दिवसांसाठी असू शकते.
मात्र वयाच्या 45 वर्षानंतर महिलांमध्ये मासिक पाळी येणं थांबते. याला मेनोपॉज म्हणतात.
मेनोपॉजच्या काळात महिलांना असंतुलित हार्मोनल, मूड स्विंग्स, केस गळणे, तणाव यासारक्या समस्या होऊ शकतात.
मेनोपॉज दरम्याण महिलांना त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावा लागतं.
मेनोपॉजच्या काळात महिलांनी आहारात सोयाबीनचा समावेश करावा. यामुळे शरीरातील हार्मोन्स संतुलित होण्यास मदत होते.
मेनोपॉजच्या काळात पालेभाज्या खाणं अत्यंत उपयुक्त मानलं जातं. याच्या सेवनामुळे शरीरात अवश्यक पोषण मिळण्यास मदत होते.
मेनोपॉजच्या काळात महिलांनी आहारामध्ये बदाम, अक्रोड, चिया सिड्स, सुर्यफूल बियांचे सेवन करा यामुळे शरीरातील फायबरची मात्र नियंत्रित राहाते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.