Shruti Vilas Kadam
टॉवेलमध्ये त्वचेवरील घाम, तेल आणि सूक्ष्मजीव राहू शकतात. त्यामुळे दुसऱ्याचा टॉवेल वापरणे टाळणे चांगले.
चेहऱ्यावर वापरला जाणारा रुमाल त्वचेच्या संपर्कात येत असल्याने तो वैयक्तिक वापरासाठीच ठेवणे योग्य.
मेकअप ब्रशवर तेल, मृत त्वचा आणि बॅक्टेरिया जमा होऊ शकतात. त्यामुळे ब्रश दुसऱ्यासोबत वापरल्यास त्वचेच्या समस्या होण्याची शक्यता असते.
फाउंडेशन किंवा कन्सीलर लावण्यासाठी वापरलेला स्पंज त्वचेच्या थेट संपर्कात येतो. त्यामुळे तो वैयक्तिक वापरासाठीच असावा.
रेझरमुळे त्वचेवर सूक्ष्म जखमा होऊ शकतात. त्यामुळे संसर्गाचा धोका टाळण्यासाठी रेझर कोणासोबतही शेअर करू नये.
थेट त्वचेवर लागणारे अप्लिकेटर किंवा पॅड दुसऱ्यासोबत वापरल्यास सूक्ष्मजीवांचा प्रसार होऊ शकतो.
कंगवा किंवा हेअरब्रशवर त्वचेचे कण, तेल आणि इतर सूक्ष्मजीव राहू शकतात. त्यामुळे वैयक्तिक वस्तू वेगळ्या ठेवणे चांगले.