Shraddha Thik
बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही वर्षांत त्याची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत.
लॅन्सेट या मेडिकल जर्नलच्या अहवालानुसार, गेल्या 10 वर्षांत महिलांमध्ये हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
जीवनशैलीतील बदल आणि धूम्रपान ही त्याची प्रमुख कारणं आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, महिलांचा आहार आणि जीवनशैली पूर्वीच्या तुलनेत खूपच बिघडली आहे.
दरवर्षी 35% महिलांच्या मृत्यूसाठी हार्ट डिजीज कारणीभूत असतो, जो कॅन्सरपेक्षा जास्त असतो. कोणत्याही वयोगटातील महिलांमध्ये याचा प्रसार होत आहे. असे असूनही महिला याकडे गांभीर्याने पाहत नाहीत.
डॉक्टरांच्या मते हार्ट डिसीजचं एकच कारण नाही तर अनेक कारणे असू शकतात. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही याचा फटका बसतो.
हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा, खराब जीवनशैली आणि उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक झटका येत आहे.
यामध्ये मधुमेहासारख्या आजारांचा समावेश आहे. जर योग्य वेळीच याबाबत माहिती मिळाली किंवा त्यातील जोखीम घटक ओळखले गेले, तर महिलांना हा धोका बऱ्याच अंशी कमी करता येईल.