Shraddha Thik
महिलांना स्वच्छता खूप जास्त आवडते, त्यामुळे त्या स्वत:ची काळजी फारच छान पद्धतीने घेतात.
काही महिलांना त्यांच्या प्रायव्हेट पार्टची स्वच्छता कशी राखावी हे कळत नाही, आणि याकारणांनी अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.
महिलांचा प्रायव्हेट पार्ट हा फार संवेदनशील असतो, त्यामुळे तेथील स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
महिलांनी प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करण्यासाठी खूप गरम किंवा खूप थंड पाण्याने वापरू नये. यामुळे तुम्हाला आणखीन त्रास होऊ शकतो. हे नेहमी कोमट पाण्याने स्वच्छ करा.
प्रायव्हेट पार्टच्या ठिकाणी साबण किंवा इतर रासायनिकयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करणे टाळा. ते अत्यंत हानिकारक आहे.
साबण किंवा इतर रासायनिक प्रोडक्ट्स वापर केल्यानंतर योनीची पीएच पातळी खराब होऊ शकते, जे हानिकारक आहे.
प्रायव्हेट पार्ट स्वच्छ केल्यानंतर कोरड्या आणि मऊ कापडाने पुसणे महत्वाचे आहे. प्रायव्हेट पार्ट पूर्णपणे कोरडे झाल्यानंतरच इनरवेअर घालावेत.
मासिक पाळी दरम्यान 6-6 तासांच्या अंतराने पॅड बदलले पाहिजेत. एकच पॅड जास्तवेळ वापरल्याने योनीमध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक तपशीलासाठी वैद्यकीय सल्ला घ्या.