Manasvi Choudhary
वजन कमी करण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. वजनासोबत पोटावरची चरबी कमी करणं महिलांसाठी आव्हानात्मक असते. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये कोणते बदल करणे याविषयी सांगणार आहोत.
सोशल मीडियावर वजन कमी करण्याविषयी काय केले पाहिजे. याविषयी माहिती देतात.
नुकतंच, आहारतज्ज्ञ रूची शर्मा यांनी एक महिन्यात ५ किलो वजन कमी करण्यासाठी काय केले याविषयी सांगितले आहे.
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी जीम किंवा कोणत्याही औषधांची गरज नाही. तुम्ही खाण्यापिण्याची सवयींमध्ये बदल केला तर तुम्हाला फायदा होतो.
रूची शर्मा, यांनी सांगितले की, ५ पदार्थ तुमचे वजन वाढवण्यासाठी कारणीभूत आहेत ते तुम्ही खाणे टाळले पाहिजे.
स्वयंपाकात वापरले जाणारे रिफाइंड तेल वजन वाढवण्यास कारणीभूत ठरते. याऐवजी निरोगी पर्याय म्हणून 'कोल्ड प्रेस्ड' खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल वापरावे.
ब्रेड, न्यूडल्स, चीज, मॅगी, यासांरखे पदार्थ खाणे टाळा. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी डाएटमध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
भूक लागल्यानंतर अनेकजण बिस्कीट, चिवडा खातात हे खाणे टाळावे. फ्लेवर कॉफी आणि स्मूदी यापेक्षा तुम्ही ब्लॅक कॉफी आणि हर्बल टी प्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या.