Woman Fitness Tips: पाठदुखी, थकवा आणि अशक्तपणा होईल दूर; महिलांनी रोजच्या सवयींमध्ये करा हे 8 बदल

Manasvi Choudhary

महिलांनी फिटनेसकडे द्या लक्ष

आजकालच्या धावपळीच्या जीनवशैलीत महिला कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक करिअर अशा दोन्हीमध्ये आघाडीवर असल्यातरी त्यांच्या स्वत:च्या आरोग्याकडे आणि फिटनेसकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, पाठदुखी, डोकेदुखी, सततचा थकवा आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.

Woman Fitness Tips | PINTREST

दररोच्या 8 चांगल्या सवयी कोणत्या

महिलांनी स्वतःला निरोगी, ऊर्जावान आणि फिट ठेवण्यासाठी आपल्या दररोजच्या सवयींमध्ये कोणत्या 8 गोष्टींचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Woman Fitness Tips | Google

पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता करा

सकाळी घाईगडबडीत अनेकदा महिला नाश्ता करणे टाळतात, ज्यामुळे दिवसभर अशक्तपणा जाणवतो. सकाळी प्रोटीन आणि फायबरयुक्त नाश्ता केल्याने शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते.

Healthy Morning Breakfast | Saam Tv

दररोज किमान एक फळ खा

आपल्या आहारात रोज किमान एका फळाचा आवर्जून समावेश करा. फळ खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आवश्यक जीवनसत्त्वे मिळतात.

Eat One Fruit Daily | pinterest

भरपूर पाणी प्या

घरच्या कामात महिला अनेकदा पाणी पिणे विसरतात. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास डिहायड्रेशन, थकवा आणि स्किन प्रॉब्लेम्स होऊ शकतात, म्हणून दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्या.

drink water | pinterest

लोहयुक्त अन्नाचे सेवन करा

महिलांच्या शरीरात बऱ्याचदा लोहाची कमतरता असते. त्यासाठी आहारात पालक, बीट, डाळी, हरभरे, सोयाबीन आणि लोहयुक्त हिरव्या भाज्यांचा नियमित समावेश करा.

Fruits and vegetables | pinterest

वजन कमी करताना आरोग्याची काळजी घ्या

फिट राहण्यासाठी वजन कमी करताना कोणत्याही चुकीच्या डाएटिंगचा अवलंब करू नका. शरीराला ताकदीची गरज असते, त्यामुळे योग्य आणि पोषक आहारावर भर द्या.

Smart Weight Loss | PINTREST

नियमित व्यायाम करा

व्यायामासाठी वेळ काढणे गरजेचे आहे. दररोज किमान २० ते ३० मिनिटे योग, एरोबिक्स किंवा हलका व्यायाम केल्याने शरीर सक्रिय आणि लवचिक राहते.

Regular Exercise

दररोज ३० मिनिटे चालणे ठेवा

घरच्या कामांमध्ये दिवसभर धावपळ होत असली तरी, मोकळ्या हवेत सलग ३० मिनिटे चालण्याची सवय ठेवा. यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहते आणि तजेलदार वाटते.

Daily Walking | PINTREST

त्वचेची आणि झोपेची काळजी घ्या

केवळ महागड्या स्किन केअर प्रोडक्ट्सपेक्षा पुरेशी झोप ७ ते ८ तास भरपूर पाणी आणि सकस आहार यामुळे त्वचा नॅचरल ग्लो करते आणि निरोगी राहते.

Skincare & Proper Sleep | Canva

NEXT: Sugar Free Tea Or Coffee: 30 दिवस साखर न टाकता चहा-कॉफी प्यायल्यास काय होईल? जाणून घ्या शरीरात होणारे 6 बदल

Sugar Free Tea Or Coffee
येथे क्लिक करा...