Shruti Vilas Kadam
वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जितक्या कॅलरी घेताय त्यापेक्षा कमी कॅलरी घ्या. जंक फूड, साखर आणि तळलेले पदार्थ कमी करा.
जिम न करता देखील रोज ३०-४० मिनिटे चालणे, स्किपिंग, योगा किंवा सूर्य नमस्कार केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
डाळी, अंडी, फळे, भाज्या यांचा आहारात समावेश करा. यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि ओव्हरइटिंग टाळता येते.
दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या. पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढते आणि मेटाबॉलिझम सुधारते.
रोज ७-८ तासांची पुरेशी झोप घेतल्यास वजन कमी होण्याची प्रक्रिया जलद होते. कमी झोपेमुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
सॉफ्ट ड्रिंक्स, बिस्किटे, पॅकेज्ड स्नॅक्स यांसारख्या पदार्थांपासून दूर राहा. हे वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात.
३ महिन्यांत परिणाम दिसण्यासाठी सातत्य खूप महत्त्वाचे आहे. अचानक मोठे बदल करण्याऐवजी छोटे पण सातत्यपूर्ण बदल करा.