Perfect crispy dosa recipe: या पद्धतीने डोसा अजिबात तुटणार नाही; बनवा परफेक्ट कुरकुरीत डोसा

Surabhi Jayashree Jagdish

डोसा

डोसा हा एक असा पदार्थ आहे जो सर्वांना आवडतो. अनेकजण डोसा घरात बनवतात. पण तवा नॉनस्टिक नसल्यास डोसा चिकटतो.

परफेक्ट डोसा

बाजारासारखा डोसा घरात बनवण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. घरी साध्या तव्यावरही डोसा परफेक्ट होऊ शकतो. यासाठी थोडी तयारी आवश्यक आहे.

डोश्याचं पीठ

डोश्याचे पीठ तयार झाल्यावर त्यात थोडं ईनो घाला. यामुळे डोसा हलका आणि कुरकुरीत होतो. यामुळे त्याला बाजारासारखी मिळते.

तवा

डोसा बनवण्यासाठी तवा चांगला गरम करा. गरम झाल्यावर थोडं तेल घाला आणि पूर्ण पुसून टाका.

पाण्याने धुवा

तवा दोन-तीन वेळा पाण्याने धुवा. ही प्रक्रिया तवा नैसर्गिकरित्या नॉनस्टिक बनवते. डोसा चिकटण्याची शक्यता कमी होते.

कांदा

डोसा बनवण्यापूर्वी एक कांदा कापून तव्यावर चोळा. यानंतर पु्न्हा तवा पुसून घ्या. यामुळे डोसा सहज सुटतो.

पीठ तव्यावर टाका

आता डोश्याचं पीठ तव्यावर घाला. ते अजिबात चिकटणार नाही. नॉनस्टिक तवा असो वा नसो या प्रोसेसने डोसा परफेक्ट बनेल.

Blouse Colors Slim Arms: ब्लाऊज घातल्यावर दंड जाड दिसतो? या रंगाचे ब्लाऊज वापरा, दंड दिसेल एकदम स्लिम

येथे क्लिक करा