Manasvi Choudhary
व्यक्तीला साधारत: ३२ दात असतात. यापैकी वरील दोन आणि खाली दोन अशा ४ अक्कल दाढा असतात.
अक्कल दाढ तोंडात दातांच्या ओळीत सगळ्यात शेवटी असते.
वयाच्या १६ ते २५ या वयात येते. कधी ही दाढ वयाच्या २५ नंतर देखील येते.मेंदूचा पूर्ण विकास झाल्यावर ही दाढ येते म्हणून तिला अक्कल दाढ म्हणतात.
अक्कल दाढ खूप उशीरा म्हणजे प्रौढ वयात येते. तोपर्यंत व्यक्ती कोणताही निर्णय घेण्यासाठी सक्षम असते आणि यावेळी व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकतो.
अक्कल दाढ येताना प्रचंड वेदना जाणवतात, त्यामुळे घाबरून जाऊ नका वैद्यकीय सल्ला घ्या
अक्कल दाढ येत असताना आहारात बदल करावा. मऊ आणि शिजवलेल्या अन्नाचा आहारात समावेश करावा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे योग्य तपशिलासाठी वैद्यकीय सल्ला घ्या