ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्र हा निसर्ग, झाडी, डोंगल दऱ्यांनी समृद्ध आहे. महाराष्ट्रात फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत.
जर तुम्हीही ट्रेकिंगला जाण्याचा विचार करत असाल तर या स्थळांना नक्की भेट द्या.
कळसुबाई हे ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या जवळ सांधण व्हॅली आहे. निसर्गाने समृद्ध असलेल्या या ठिकाणी नक्की भेट द्या.
रायगडमधील देवकुंड धबधबा खूप जास्त सुंदर आहे. हा धबधबा २००० फुट उंचीवर आहे.
मुळशी तालुक्यातील सह्याद्रीच्या घनदाट जंगलात तुम्ही फिरण्यासाठी जाऊ शकतात.
हरिहर गड हा ट्रेकर्ससाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या किल्ल्यावर ९० अंशापर्यंतच्या कोनात चढून जावे लागते.
हिरवीगार झाडी, झरे असलेल्या भीमाशंकर या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. येथील निसर्ग तुमच्यासाठी खूप चांगला अनुभव असेल.