कोमल दामुद्रे
नाशिकपासून काही तासांच्या अंतरावर असलेला हा मांगी-तुंगी किल्ला पर्यटक प्रेमींच्या आकर्षणाचे ठिकाण आहे.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात भिलवड गावाच्याजवळ हा किल्ला वसला आहे.
येथे जैन तीर्थक्षेत्र असून सुमारे दोन हजारांहून अधिक पायऱ्या येथे आहेत.
नुकतेच या ठिकाणी जैन धर्मीयांचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे.
मांगी-तुंगी हे मध्यभागी पठार असलेले एक प्रमुख दुहेरी शिखर आहे.
नाशिकपासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या बागलाण तालुक्यात वसलेल्या मांगी तुंगीचे वर्णन सिद्ध क्षेत्र म्हणून केले जाते.
या टेकडीवर सात जुनी मंदिरे असून येथे अनेक संतांच्या चरणांच्या प्रतिमा आहेत.