कोमल दामुद्रे
नवी मुंबईतील अनेक स्ट्रीटवर चमचमीत पदार्थांची चव चाखयला मिळते.
वडा पाव, मिसळ पाव, रगडा पॅटीस, बटाटा वडा हे पदार्थ मुंबईची शान म्हणून ओळखले जातात.
नवी मुंबईतील कोणत्या ठिकाणी सगळ्यात फेमस मिसळ मिळते हे पाहूया
नवी मुंबईला गेलात तर मिसळ पाव खाण्यासाठी ही ठिकाणे पहायला विसरू नका.
नवी मुंबईतील वाशी या ठिकाणी मामलेदार मिसळ प्रसिद्ध आहे. या मिसळीची चव ६० रुपयांपासून चाखायला मिळते.
खारघरमधील गुरुद्वारा रोडजवळ श्रीसमर्थ मिसळ कॅफे अधिक लोकप्रिय आहे. या मिसळीची चव चाखायची असेल तर ४५ रुपयांपासून सुरुवात होते.
नवी मुंबईतील ऐरोली येथे मिसळ माऊली मिसळ- नाद नाशिकचा ही मिसळ फेमस आहे. दोन प्रकारच्या मिसळची चव या ठिकाणी चाखायला मिळते.