Manasvi Choudhary
दिवाळीतनंतर लग्नाचे शुभ मुहूर्त आहेत. लग्नानंतर कपल हनिमूनसाठी विविध ठिकाणी भेट देतात.
लग्न झाल्यानंतर अनेक जोडप्यांना एकमेकांना वेळ द्यायचा असतो अशावेळी फिरायला जाण्यासाठी बेस्ट ठिकाणं कोणती हे माहित असणं महत्वाचं आहे.
तुम्ही देखील पार्टनरसोबत फिरण्याचा प्लान करत असाल तर ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत.
माथेरान हे ठिकाण हिवाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट आहे. येथील वातावरण तुम्हाला भुरळ घालेल.
महाबळेश्वरला मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वर हिवाळ्यात येथील दृश्य सुंदर दिसते.
मुंबईत फिरण्यासाठी बेस्ट ठिकाणे आहेत. तुम्ही मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटीवर फिरायला जाऊ शकता.
गोवा हे हनिमूनसाठी सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. सुंदर बीच, नाईट लाईफ जगण्याची मज्जा या ठिकाणी येते.