Manasvi Choudhary
हिवाळ्यात तीळ खाणे आरोग्यासाठी वरदान मानले जाते. तिळाचे लाडू हिवाळ्यात बनवले जातात.
तिळाचे लाडू हिवाळ्यात खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि हाडे देखील मजबूत होतात.
तिळाचे लाडू घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्याघरी तिळाचे लाडू सहज बनवू शकता.
तिळाचे लाडू बनवण्यासाठी तीळ, तूप आणि गूळ, शेंगदाणे, डाळ्या हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम गॅसवर कढईमध्ये तीळ भाजून घ्या. तीळ भाजताना ते जळणार नाही याची काळजी घ्या.
दुसऱ्या एका कढईमध्ये एक चमचा तूप टाका आणि त्यात गूळ मिक्स करा आणि परतून घ्या.
गूळ वितळल्यानंतर त्यात आधी भाजलेले तीळ मिक्स करा आणि शेंगदाण्याचा कूट टाका.
सर्व मिश्रण एकत्र परतून घ्या आणि मिश्रणाचे लहान लहान गोला लडू वळून घ्या. अशाप्रकारे तिळाचे घरच्याघरी हेल्दी लाडू तयार करा.