Manasvi Choudhary
प्रत्येक राज्यांची विशेष ओळख आहे. तेथील खाद्यपदार्थ, पोशाख, राहणीमान वेगवेगळा असतो.
आज आपण बिहारी स्टाईल आलू चोखा रेसिपी कशी करतात ते पाहूया.
आलू चोखा बनवण्यासाठी बटाटे, कांदा, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबाचा रस, मोहरीचे तेल, मीठ, जिरा पावडर, मसाला हे साहित्य एकत्र करा.
सर्वप्रथम आलू चोखा बनवण्यासाठी बटाटे उकडून ते चांगले मॅश करा.
बटाटेच्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो पेस्ट हे मिक्स करा.
नंतर या मिश्रणात चवीनुसार मीठ, मसाला, जिरा पावडर आणि लिंबाचा रस मिक्स करा.
मिश्रणात कच्चा मोहरीचे तेल वरतून घाला आणि सर्व मिश्रण एकत्र मिक्स करा.
अशाप्रकारे मसालेदार आलू चोखा रेसिपी सर्व्हसाठी तयार होईल.