Shreya Maskar
मटार हलवा बनवण्यासाठी ताजे मटार, चिमूटभर मीठ, सोडा, तूप, सुका मेवा, चारोळी, बेदाणे, जायफळ, वेलची पावडर इत्यादी साहित्य लागते.
तसेच यात किसलेला खवा आणि किसलेला गूळही वापरतात.
मटार हलवा बनवण्यासाठी सर्मप्रथम पॅनमध्ये चिमूटभर मीठ आणि सोडा टाकून मटार उकडून घ्या.
मटार मिक्सरला जाडसर वाटून घ्या.
आता पॅनमध्ये तूप घालून त्यात गूळ विरघळून घ्यावा.
आता या मिश्रणात गूळ, किसलेला खवा, सुकामेवा टाकून मस्त एकजीव करा.
हलवा मस्त शिजल्यावर त्यात चारोळी, बेदाणे, जायफळ आणि वेलची पावडर घालावी.
खमंग मटार हलवा तयार झाला.