Shreya Maskar
संध्याकाळी नाश्त्याला तुम्ही चीज गार्लिक ब्रेड बनवा.
चीज गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी ब्रेड, चीज, लोणी, लसूण, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स , मीठ इत्यादी साहित्य लागते.
चीज गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बटर, ओरेगॅनो, किसलेला लसूण, चिमूटभर मीठ आणि चिली फ्लेक्स घालून मिक्स करा.
पॅनवर बटर टाकून ब्रेडचे दोन स्लाइस भाजून घ्या.
ब्रेडच्या दोन्ही स्लाइसमध्ये चीज स्लाइस ठेवून चांगले बेक करा.
चीज पूर्णपणे वितळवणे गरजेचे आहे.
आता गार्लिक ब्रेडचा सॉस किंवा चटणीसोबत आस्वाद घ्या.
गार्लिक ब्रेड अजून स्वादिष्ट बनवण्यासाठी तुम्ही वरून चीज आणि चिली फेक्स टाकू शकता.