Manasvi Choudhary
हिवाळ्यात वातावरण थंड असते यामुळे शरीराला उष्ण वाटणाऱ्या पदार्थाचे सेवन केले जाते.
हिवाळ्यात थंडीच्या दिवसात मेथीच्या लाडूचे सेवन केले जातात. मेथीचे लाडू घरी बनवण्याची पद्धत सोपी आहे.
मेथीमध्ये अॅटीऑक्साईड गुणधर्म असतात, जे सांधे आणि स्नायूंचा ताण कमी करतात. मेथीत फायबरचे प्रमाण भरपूर असल्यामुळे पचन सुधारते
मेथीच्या लाडू बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, तूप, गूळ, सुकं खोबरं, खारीक, वेलची, बदाम, काजू, हालिम, खसखस, रवा, डींक, मेथी दाणे हे साहित्य घ्या.
गॅसवर कढईत मेथी दाणे, हलिम, सुखं खोबरे, खसखस, रवा हलके भाजून घ्या.
यानंतर तूपामध्ये डिंक परतून घ्या, गॅसवर कढईत तूप परत घालून त्यामध्ये गव्हाचे पीठ ब्राऊन रंग होईपर्यंत भाजून घ्या.
मिक्सरमध्ये मेथी दाणे, वेलची वाटून एका परातीत गव्हाच्या पीठामध्ये मिक्स करून घ्या. यानंतर खारीक आणि ड्रायफ्रुट्स घालून सर्व मिश्रण एकजीव करा.
एका भांड्यात पाणी घ्या त्यामध्ये गूळ घाला अश्याप्रकारे गुळाचा पाक तयार होईल. यामध्ये तूप घालून मिश्रण चांगले ढवळून घ्या.
मोठ्या भांड्यात हे सर्व मिश्रण एकजीव करून गोल आकार छान मेथीचे लाडू वळून घ्या.