Manasvi Choudhary
भारतात दाक्षिणात्य पदार्थ अत्यंत प्रसिद्ध आहेत. डोसा, उपमा, सांबर, मेंदूवडा आणि भात हे दक्षिणेकडील पदार्थ आहेत.
पारंपारिक पद्धती आणि मातीच्या भांड्यांसारख्या स्वयंपाकाच्या भांड्यांचा वापर, तसेच केळीच्या पानांवर जेवण वाढण्याची जुनी प्रथा असते.
साऊथ इंडियन खाद्यपदार्थात तांदूळ, उडीद डाळ, तूर डाळ, नारळ यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हे घटक शरीराला ऊर्जा, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स देतात.
कढीपत्ता, मोहरी, मेथी, हिंग, कोकम, लाल मिरची, सांबार मसाला यांच्या मिश्रणामुळे पदार्थांना अनोखी सुगंधी चव येते. हा तडका चवीसोबत पचनक्रिया देखील सुधारवतो.
वाफवणे, भाजणे, आंबवणे, मातीच्या भांड्यात बनवणे अशा पारंपारिक पद्धती आजही वापरल्या जातात.यामुळे नैसर्गिक चव टिकून राहते
साऊथ इंडियन पदार्थ हे त्यांची चव आणि संतुलित आहारासाठी ओळखले जातात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या