ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात त्वचा ड्राय होते अनेक त्वचेच्या समस्या निर्माण होतात. अश्यातच त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.
ऍव्होकॅडो आणि मध दोन्हीमध्ये त्वचेसाठी आवश्यक पोषक घटक आहेत. हे दोन घटक एकत्र केल्याने स्किनला डीप हायड्रेशन मिळत.
ऍव्होकॅडोमध्ये व्हिटॅमिन E, C आणि नैसर्गिक तेलं मुबलक असतात.हे त्वचेला मॉइस्चर देतं, लवचिकता वाढवतं आणि डल स्किनला नवा उजाळा देतं.
मध नैसर्गिक ह्युमेक्टंट आहे . तो त्वचेमधील ओलावा टिकवून ठेवतो. त्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे पिंपल्स आणि इंफेक्शनपासून संरक्षण देतात.
एका पिकलेल्या ऍव्होकॅडोचे पल्प काढून घ्या. एक चमचा शुद्ध मध घ्या.एक छोटा बाउल आणि चमचा मिक्सिंगसाठी घ्या.
१ चमचा ऍव्होकॅडो पल्प आणि १ चमचा मध एकत्र नीट मिक्स करा.मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत हालवा, जेणेकरून ते सहज चेहऱ्यावर लावता येईल.
चेहरा हलक्या कोमट पाण्याने धुवा आणि कोरडा करुन तयार मास्क चेहऱ्यावर व मानेला लावा. त्यानंतर १५ मिनिटं ठेवून कोमट पाण्याने धुवा.
हा मास्क आठवड्यातून २ वेळा वापरा. त्वचा त्वरित मऊ, तजेलदार आणि मॉइस्चरायझ्ड राहिल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.