Winter Skin Dry Problem: हिवाळ्यात त्वचा कोरडी का होते? या चूका टाळा

Manasvi Choudhary

त्वचेची काळजी

हिवाळ्यात त्वचेची योग्य प्रकारे काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात त्वचा कोरडी होते यामुळे त्वचेच्या समस्या जाणवतात.

Winter Dry Skin Problem

वातावरणीय बदल

हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे आरोग्यावर परिणाम होतो. याचा परिणाम हा त्वचेवर होतो यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते.

Winter Dry Skin Problem

नैसर्गिक ओलावा कमी

हिवाळ्यात हवा थंड आणि कोरडी असते, म्हणजेच हवेतील आर्द्रता खूप कमी होते याचा परिणाम त्वचेवर होतो आणि त्वचा देखील कोरडी होते.

Oily Skin | ai

अति गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा

हिवाळ्यात आपण जास्त गरम पाण्याने अंघोळ करतो. गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल लवकर काढून टाकते जे तेल त्वचेत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे असते. तेल निघाल्यावर त्वचा कोरडी पडते.

bath | yandex

उबदार वस्त्र

हिवाळ्यात लोकरीचे आणि जाड कपडे त्वचेशी घासले जातात, ज्यामुळे त्वचा चिडचिडू शकते आणि कोरडी होते.

Winter Dry Skin Problem

पाणी कमी प्यायल्याने

हिवाळ्यात थंडी असल्यामुळे आपण पाणी कमी पितो मात्र त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या. त्वचा कोरडी होणार नाही.

Drink water | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam Tv

next: Lingana Fort: शिवलिंगाच्या आकाराचा 'लिंगाणा किल्ला' चा इतिहास माहितीये का?

येथे क्लिक करा..