Manasvi Choudhary
त्वचा सुंदर दिसण्यासाठी महिला व मुली अनेक घरगुती उपाय करतात.
तुम्हाला माहितीये का? दुधाची साय चेहऱ्याला लावल्याने देखील चेहऱ्याला फायदा होतो.
दूध हे केवळ शरीरासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायद्याचे आहे.
दुधाची साय चेहऱ्याला लावल्याने त्वचा मॉइश्चरायज होते. त्वचा हायड्रेट राहते.
उन्हात फिरल्यामुळे त्वचा काळी पडते अशावेळी तुम्ही घरगुती उपाय म्हणून त्वचेला दुधाची साय लावून हलके मालिश करा.
चेहऱ्यावर पिंगमेंटेशनची समस्या होत असेल तर तुम्ही रोज रात्री दुधाची साय चेहऱ्याला लावा.
दुधाची साय त्वचेला मॉइश्चरायझ करते यामुळे त्वचा चमकदार होण्यास देखील मदत होते.
वाढत्या वयात त्वचा खराब होते यामुळे त्वचेवर दुधाची साय लावल्यास त्वचा मऊ होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.