Manasvi Choudhary
हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे त्वचा निस्तेज, रखरखीत आणि कोरडी पडते.
बाजारात मिळणारे कितीही महागडे मॉइश्चरायझर किंवा लोशन लावले, तरी काही तासांतच त्वचा पुन्हा कोरडी पडते. यासाठी आज आपण काही घरगुती टिप्स जाणून घेऊया.
हिवाळ्यात त्वचेचा वारंवार कोरडी पडत असेल तर खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल फायदेशीर आहे. अंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास आधी शरीराला खोबरेल तेल किंवा मोहरीच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करा.
मधात नैसर्गिक जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जी त्वचेला आतून खोलवर आर्द्रता देतात. अंघोळीआधी थोडे मध आणि खोबरेल तेल एकत्र करून त्वचेवर लावा आणि काही वेळ मालिश करा. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते.
कोरफड जेलमध्ये पॉलिसॅकराइड्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे हिवाळ्यात डॅमेज झालेल्या त्वचेची दुरुस्ती करतात. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर आणि हाता-पायांवर शुद्ध कोरफड जेल लावून हलक्या हाताने मसाज करा.
हिवाळ्यात खूप जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा. गरम पाण्यामुळेे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते. आणि त्वचा अधिक कोरडी पडते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या