ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात त्वचा रखरखीत होऊन कुरुप दिसते. त्वचा मऊ करण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करा.
ओट्स मिल्क-हनी मास्क त्वचेला पोषण देण्यास आणि ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो.
ओट्स, दूध आणि मध. या तीन्ही गोष्टींना समान प्रमाणात घ्या आणि त्याचे मिश्रण तयार करा.
ओट्सला मिक्सरमध्ये वाटून घ्या त्यात मध मिसळा आणि त्याची जाड घट्ट पेस्ट बनवा.
चेहऱ्यावर एक सारख्या पध्दतीमध्ये मास्क लावा आणि मास्क १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर ठेवून द्या.
चेहऱ्यावरुन मास्क काढल्यावर चेहऱ्याला कोमट पाण्याने धुवून घ्या आणि टॉवेलने हलक्या हाताने चेहरा पुसा.
त्वचेवर ग्लो येतो आणि रखरखितपणा कमी होण्यास मदत होते. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा मास्क लावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.