Manasvi Choudhary
हिवाळ्यात आरोग्यासह शरीराची योग्य प्रकारे काळजी घ्यावी लागते. थंड वातावरणामुळे हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढतो हा त्रास टाळण्यासाठी तुम्ही घरीच उपाय करू शकता.
शरीराच्या रक्तवाहिन्या आकुंचित होऊन रक्तप्रवाह कमी होतो त्यामुळे हिवाळ्यात सांधे दुखतात.
थंडीच्या दिवसात सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही गरम पाण्याचा शेक घ्या यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि वेदना कमी होतात.
थंडीमध्ये सांधेदुखी वाढू नये म्हणून उबदार कपडे घाला. विशेषतः गुडघे, कोपर आणि हाताचे सांधे झाकून ठेवा.
थंडीत सांधेदुखीवर तुम्ही तिळाचे तेल, मोहरीचे तेल किंवा लसणाचे तेल कोमट करून हलक्या हाताने मालिश करा. यामुळे स्नायूंना आराम मिळतो.
कोरफड जेल सांधेदुखीच्या सूज व वेदना कमी करण्यास मदत करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.