ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात शरिर गरम ठेवण्याकरिता सूपाचे सेवन करावे कोथिंबिरीच्या सुगंधात तयार केलेले हे क्रिम सूप शरिराला डिटॉक्स करते आणि रोगप्रतिकाराक शक्ती वाढवण्यास मदत करते.
हे सूप पिण्यास हलकं, पौष्टिक आणि कमी कॅलरी तसेच लवकर पचणारे आहे. कोथिंबीर १ मोठी जुडी, १ मध्यम कांदा, ४ पाकळ्या लसूण, बटर- तूप १ टेबलस्पून, दूध फ्रेश क्रिम आर्धा कप, काळी मिरी, मिरी पूड, मीठ चवीनुसार, पाणी २ कप
कोथिंबीर स्वच्छ धुवून जाड देठ काढून घ्या. कोथिंबिरीची फक्त पानं आणि कोवळे देठ घ्या. हे कोथिंबीरच सूपचा हिरवा रंग आणि सुगंध देणार आहे.
कढईत बटर गरम करून त्यात कांदा आणि लसूण परतून घ्या. ते सोनेरी झाल्यावर त्यात कोथिंबीर घालून १ ते २ मिनिटं परता. जास्त परतू नका, नाहीतर हिरवा रंग जातो.
थंड झाल्यावर हे मिश्रण मिक्सरमध्ये टाका.पाणी घालून एक स्मूद पेस्ट तयार करा. हीच सूपची मुख्य प्यूरी आहे.
प्यूरी एका भांड्यात घेऊन त्यात पाणी, मीठ आणि मिरीपूड घाला.२ ते ३ मिनिटे मंद आचेवर उकळू द्या.उकळले की सूप घट्ट होते.
सूप उकळल्यानंतर गॅस कमी करा.दूध किंवा फ्रेश क्रीम घालून एक उकळी द्या. यामुळे सूप क्रीमी, मऊसर आणि रेस्टॉरंट स्टाइल होत.
गरमागरम सूप बाउलमध्ये ओतून वर थोडी कोथिंबीर आणि मिरीपूड टाका.या सूपामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच हिवाळ्यात कफ-खोकला कमी करण्यास हे सूप उपयुक्त ठरते.