ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात शरीर उबदार आणि उर्जेने भरलेले ठेवण्यासाठी सूप पिणे खूप फायदेशीर मानले जाते.
टॉमेटो सूपामध्ये व्हिटामिन सी असल्यामुळे शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. या सूपात कॅलरीज कमी असतात आणि ते पोट भरण्यास मदत करते.
पालक सूपमध्ये भरपूर आयरन असते. पालकचे सूप हिवाळ्यात पिल्याने शरिरीत अशक्तपणा जाणवत नाही. हे सूप हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
गाजर आल्याचे सूप शरिराला उबदार ठेवण्यास मदत करते. तसेच पचन शक्ती हळू हळू सुधारण्यास सुरु होते. पोटदुखी कमी होण्यास मदत होते.
मशरूम सूपमध्ये हाय प्रोटिन असतात आणि ते शरीराला बराच काळ उबदार ठेवतात. हे सूप प्यायल्याने हाडे मजबूत होतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
कॉर्न सूप चवीला स्वादिष्ट असते आणि मुलांनाही ते सहज आवडते. कॉर्न सूप हिवाळ्यासाठी एक आरोग्यदायी आणि पौष्टिक पर्याय आहे. तसेच बद्धकोष्ठता सारख्या समस्या कमी होतात.
डाळ सूप हिवाळ्यात पचायला हलके असते आणि शरीराला ऊर्जा देत. डाळ सूप पिणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
हे सगळे सूप वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरिर अॅक्टिव्ह बनवण्यासाठी मदत करतात.