Manasvi Choudhary
थंडीच्या दिवसात पायांच्या टाचांना भेगा पडणे ही समस्या सामान्य आहे.
कडाक्याच्या थंडीत त्वचा कोरडी व कडत होते ज्यामुळे पायांच्या टाचांना देखील भेगा पडतात.
पायांच्या टाचांना भेगा पडल्यास घरगुती उपायांनी काळजी घेतली पाहिजे.
कोमट पाण्यात पाय टाकून बसल्याने टाच स्वच्छ होते व मृत त्वचा नष्ट होते.
भेगा पडलेल्या टाचांना कोरफडीचे जेल लावा ज्यामुळे जळजळ होणार नाही
रात्री झोपताना टाचांवर पेट्रोलियम जेल लावून सॉक्स घाला.
रात्री झोपण्यापूर्वी टाचांवर खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल लावल्याने टाचांना ओलावा मिळेल.
नारळाचे दूध नैसर्गिक मॉईश्चरायझर आहे यामुळे दिवसातून दोनदा टाचांवर लावा.