Shreya Maskar
हिवाळ्यात अनेक महिला थंडीमुळे साडी नेसणे टाळतात. पण तुम्ही थंडीतही साडी नेसून स्टायलिश लूक करू शकता. यासाठी तुम्ही साडी स्वेटरसोबत नेसा. एक क्लासी लूक येईल.
तुम्ही थंडीत कार्डिगनसोबत साडी नेसा. ते तुम्हाला उबदार ठेवेल आणि लूकही चांगला येईल. तुम्ही साडीला कॉन्ट्रास्ट रंगाचे कार्डिगन निवडा. इंडो वेस्टन लूक येईल.
ऑफिसमध्ये तुम्हाला बॉसी लूक हवा असेल लाँग कोट बेस्ट ऑप्शन आहे. सुंदर साडी नेसा आणि त्यावर स्टायलिश लाँग कोट घाला. सर्व जण तुमच्या फॅशनचे कौतुक करतील.
लाँग कोट , जॅकेटसोबत साडी नेसल्याने एक वेस्टन लूक येतो. थंडीत एखाद्या पार्टीसाठी तुम्ही हे नक्की ट्राय करा.
साडी आणि डेनिम जॅकेट हे सर्वात सुंदर कॉम्बिनेशन आहे. यात पारंपरिक, वेस्टन, इंडो-वेस्टन सर्व लूक येतात. ही एक क्लासी स्टाइल आहे.
तुम्ही प्रिंटेड साडी नेसणार असाल तर त्यावर शॉलच्या प्रिंटचे स्वेटर घालू शकता. यामुळे तुमचा लूक उठून दिसेल. तसेच तुम्हाला थंडी वाजणार नाही.
हिवाळी लग्नासाठी साडीवर मखमली जॅकेट हे एक उत्तम आणि शाही कॉम्बिनेशन आहे. लग्नात तुमच्याच सौंदर्याचे कौतुक होईल.
स्वेटरसह साडी नेसताना स्वेटरच्या आत पल्लू न टाकता, तो बाहेरून घेतल्यास स्वेटरचा लूक अधिक उठून दिसतो.